नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना पारंपारिक पदवी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे : प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)


वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये "भूमापन सर्वेक्षण तंत्र", या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर. सोबत डॉ. के. आर. जाधव, डॉ. आर. बी. पाटील, डॉ. संतोष जांभळे.

वारणानगर/ प्रतिनिधी :    

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालया मध्ये भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने कौशल विकास उपक्रम अंतर्गत "भूमापन, सर्वेक्षण तंत्र", या विषयावरील अल्प कालावधीतील प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, वाळवा येथील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. के. आर. जाधव या वेळी उपस्थित होते. डॉ. पी. एस. राऊत, डॉ. आर.बी. पाटील, डॉ. एस. एस. खोत, डॉ. संतोष जांभळे यांनी प्रशिक्षण मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. जवळपास रोज दोन तास याप्रमाणे चाळीस दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध विभागातील ५० हून अधिक विद्यार्थी - विद्यार्थिनींनी  सहभाग नोंदविला. यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, "नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना पारंपारिक पदवी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात विविध कौशल्य विकासासाठी  उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. भूमापन सर्वेक्षण तंत्र- ज्ञान प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्याला किमान स्वतःचे घर, शेती, मोकळी जमीन, प्लॉट इत्यादी कसे मोजतात याचे काटेकोर ज्ञान मिळेल. यातच विद्यार्थांनी प्रगती केली तर नव तंत्रज्ञानाच्या साह्याने स्वतःचा रोजगार स्वतः उभा करू शकतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. के.आर. जाधव म्हणाले की," उच्चशिक्षित झाल्यानंतरही भूमापन तंत्राबद्दल अनेक लोक या ज्ञानापासून खूप दूर आहेत. अगदी सातबारा आठ अ याच्या नोंदी कशा ओळखाव्यात या पद्धतीची  माहिती- तंत्र संदर्भात अशा कार्यशाळातून ज्ञान प्राप्त होईल." कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. पी.एस. राऊत यांनी केले, सूत्रसंचालन आणि प्रशिक्षणासंदर्भात माहिती डॉ. आर.बी. पाटील यांनी दिली. यावेळी डॉ.एस.एस. खोत यांनी "मानवी मूल्य आणि कौशल्य", विकासासाठी महाविद्यालयात सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला व  ए. एन. यादव यांनी सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

 Promoted content :  

🔴 वारणानगर मध्ये महिला दिनानिमित्त शोभाताई कोरे आईसाहेब स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न...

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शेअर बाजारातील संधी, समज व गैरसमज या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.

🔴 महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

🔴 व्हिजन ग्रीन काखे तर्फे २०२५ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प.../ Vision Green Kakhe

🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग.

Post a Comment

0 Comments